भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंगा न पाहती । ज्ञान गाडेवर बोलती

panduranga na pahati | dnyan gadevar bolati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पांडुरंगा न पाहती । ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥ त्यांचे न व्हावें दर्शन । दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥ नायकावें त्यांचे बोल । विठ्ठल कृपेंविण फोल ॥३॥ निळा म्हणे करितीं कथा । अवघी पोकळ त्यांची वृथा ॥४॥