भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांडुरंग हरि माजी भक्तजन

pandurang hari maji bhaktajan

पांडुरंग हरि माजी भक्तजन । कैसें वृंदावन शोभतुसे ॥ १ ॥ ब्रह्मादिक ठेले विमानें अंबरीं । काला तो गजरीं पंढरिये ॥ २ ॥ सनकादिक देव देहुढापाउलीं । गोपाळ वांकुली दाविताती ॥ ३ ॥ पुंडलिका नाचे देवमुनी सर्व । भीमातीरीं देव प्रगटले ॥ ४ ॥ ज्ञानदेव सोपान विसोबा खेंचर । नरहरि सोनार नाचताती ॥ ५ ॥ निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा । हरिचा पवाडा झेलिताती ॥ ६ ॥