भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा

pandharichen sukh pahatan ek ghadi | vas kalpa kodi vai-kunthincha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥ आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥ हें सुख सुरवरां स्वप्नीं नाही दृष्टीं । जैसें वाळंवटीं तुह्मां आह्मां ॥३॥ धन्य चंद्रभागा पुण्य सरोवर । धन्य भीमातीर पुण्य भूमी ॥४॥ धन्य नरनारी गर्जती हरिनामें । ऐ-कोनि प्रेमें डोले शूळपानी ॥५॥ धन्य वेणुनाद धन्य वृंदावन । धन्य तें महिमान क्षेत्रवासी ॥६॥ धन्य पंचक्रोशी धन्य आसपासी । दुम-दुमी अहर्निशीं नामघोष ॥७॥ धन्य पशु पक्षि कीटक आणि भृंग । जयां अंगसंग पांडुरंगीं ॥८॥ धन्य ते तरुवर अवघे लहान थोर । अवतरले अमर गुप्तरूपें ॥९॥ धन्य ते संसारीं वर्तती जीवन्मुक्त । ज्यात आर्त असे पांडुरंगीं ॥१०॥ धन्य त्याचा वंश ज्या नामीं वि-श्वास । धन्य विष्णुदास नामा तेथें ॥११॥