भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित

pandharichen sukh ananden garjati | dhyatase parvati akhandit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचें सुख आनंदें गर्जती । ध्यातसे पार्वती अखंडित ॥१॥ भीमातीरीं उभा सखा । पांडुरंग । देई अंगसंग अखंडित ॥२॥ उशीर झाला काय कामकाजा । यावें अधोक्षजा अनिरुद्धा ॥३॥ नामा ह्मणे पाहा पंढरी माझारी । केशीराज तारी एकसरा ॥४॥