भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें

pandhariche vate anant ghadati yag | vaikunthicha marga tenen sangen

पंढरीचे वाटे अनंत घडती याग । वैकुंठीचा मार्ग तेणें संगें ॥१॥ जपतप अनुष्ठान क्रिया कर्म धर्म । हें जाणताती वर्म संतजन ॥२॥ भक्तिमार्ग फ़ुकटा आनंदाची पव्हे । लागलीसे सवे पुंडलीका ॥३॥ दिंडी टाळ घोळ गरुडटकियाचे भार । वैष्णवांचे गजर जये नगरीं ॥४॥ तिहीं लोकीं दुर्लभ अमर नेणती । होउनी पुढती सेविती ॥५॥ सनकादिक मुनी ध्यानस्त पै सदा । ब्रह्मादिकां कदा न कळे महिमा ॥६॥ ज्ञानदेव निवृत्ती पुसतसें कोडें । पुंडलिकें केवढें भाग्य केलें ॥७॥