भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग

pandhariche jan avaghe pavan | jya javali nidhan pandu-rang

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग ॥१॥ विठ्ठलनामें घेणें विठठलनामें देणें । विठठलनामें करणें सकळ काम ॥२॥ विठठलनामें क्रिया विठठलनामें कर्म । हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥ सबराभरित विठठल मागें पुढें । जिकडे जाती तिकडे विठठलचि ॥४॥ निरंतर गर्जती विठठल पवाडे । ऐत निवाडे विठठलरूप ॥५॥ विठठलनाम सरतें विठठलनाम पुरतें । विठठल नाम ज्यातें भांडवल ॥६॥ विठठलनामें करिती अवघा योग क्षेम । नित्य ज्यांचें प्रेम विठठलनामीं ॥७॥ सदा ह्लदयीं भरित विठठलाचें प्रेम । हर्षे विठठलनाम गर्जताती ॥८॥ विठठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥९॥ नामा म्हणे अवघें विठठलचि झालें । विठठलें दिधलें प्रेमसुख ॥१०॥