भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी हें क्षेत्र पावन पवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं

pandhari hen kshetra pavan pavitra | mahima vichitra tribhuvanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरी हें क्षेत्र पावन पवित्र । महिमा विचित्र त्रिभुवनीं ॥१॥ पाहिलिया क्षणीं नासती पातकें । ऐसियासी तुके दुजें कोण ॥२॥ तृण पक्षि सर्व झाले ऋषि देव । पहाती वैभव पंढरीचें ॥३॥ भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी । वैकुंठिंची परी सर्व येथें ॥४॥ टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ॥५॥ पुंडलिकासाठीं ठाके केशिराज । भेटीनें सायुज्य त्यास देती ॥६॥ स्रानें उद्धरती दर्शनें प्रशस्तीं । वाचे नाम कीर्ति विठोबाचा ॥७॥ नामा ह्मणे लाभ थोर हा जोडतो । पंढरिसी येतो प्राणी त्यासी ॥८॥