भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरी ज्ञानिया ध्यातां लक्षा नये । आह्मां वाट पहे अनाथांची

pandhari dnyaniya dhyatan laksha naye | ahman vat pahe anathanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पंढरी ज्ञानिया ध्यातां लक्षा नये । आह्मां वाट पहे अनाथांची ॥१॥ जपकांचें जाप्य नानामंत्रमय । आम्हां भक्ति प्रिय भावें सारी ॥२॥ पुंडलिकासाठीं बोललां वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचें ॥३॥ नामा म्हणे जीवें करूं निंबलोण । झणीं नारायणा दिठावसी ॥४॥