भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं । मुक्ति कामारी वोळंगती

pandharapurin dnyaneshvarin | mukti kamari volangati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पंढरपुरीं ज्ञानेश्वरीं । मुक्ति कामारी वोळंगती ॥१॥ तेथें देव येथें भक्त । महिमा अदभुत दोहींचा ॥२॥ तेथें ध्यान येथें ज्ञान । परलोक साधन दो ठायीं ॥३॥ निळा म्हणे तेथें गुरुड । येथे झाड अजानतरु ॥४॥