भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे

panchavisa vegalen mahattattva bolije

पंचविसा वेगळें महत्तत्त्व बोलिजे । तें मज अंगविजे ऐसें निवृत्तीं केलें वो माये ॥१॥ सहज बोधें बोधलें न विचारीं आपुलें । म्हणोनियां मुकलें अवघ्यांसी वो माय ॥२॥ पांचाहूनी परती मी जाहालिये निवृत्ति । चिदानंदीं सरती स्वरुपीं वो माये ॥३॥ ऐसें जाहलें चांग अचिर देवांग । रखुमादेवीवरें पांग फ़ेडिला वो माये ॥४॥