भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण

panchatattva kala sovili sampurna

पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण । त्याचेही जीवन जनार्दन ॥१॥ तो सोंवळा संपूर्ण अमृताचा घन । त्यामाजि सज्जन हरि आम्हा ॥२॥ नित्यता सोंवळा स्वयंपाकी शौच । न दिसे आमुचें आम्हां तेथें ॥३॥ निवृत्ति सोंवळा स्वयंपाकी नित्य । नाम हें अच्युत जपतसे ॥४॥