भजनी मालिका
← भजनांकडे परत

पंचबाणें माझें ह्रदय भेदलें

panchabanen majhen hraday bhedalen

पंचबाणें माझें ह्रदय भेदलें । पांचेंविण पावलें च्यार्‍ही सांडूनिया ॥१॥ सकळै माझें गोत आलें । ब्रह्मरसें जाले बाईयेवो ॥२॥ बापरखुमादेविवरु ब्रह्मरसें विवळला । मजसहित निमाला ब्रह्मरुपीगे माये ॥३॥