भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांचा दामांचा घोंगडा नेसेन

pancha damancha ghongada nesen

पांचा दामांचा घोंगडा नेसेन । उरली मोट ते मी जेविनगे बाईये ॥१॥ कामारि कामारि कामारि होऊन । या गोपाळाचें घरीं रिघेन गे बाईये ॥२॥ त्याचा उंबरा उसिसा करीन । वरि वेरझारा मी सारीनगे बाईये ॥३॥ निवृत्ति ज्ञानदेवा पुसतिल वर्म । त्यासि कामीन पुरेनगे बाईये ॥४॥