भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल तो गे काऊ कोकताहे

pail to ge kau kokatahe

पैल तो गे काऊ कोकताहे । शकूनगे माये सांगतसे ॥१॥ उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥ जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥ दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं । आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥