भजनी मालिका
← भजनांकडे परत

पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन

pail sukhacheni maye sukalu | naval pahije ho gopalu | mhanoni yogayag tap sadhan

पैल सुखाचेनि माये सुकाळु । नवल पाहिजे हो गोपाळु । म्हणोनि योगयाग तप साधन । व्रत दान उद्यापन । पंचाग्नि गोरांजन अनुष्ठान । परि पद निर्वाण नकळें हें ॥१॥ तुझ्या नामाचिनि आनंदे । गातांवातां जोडसी विनोदें रया ॥ध्रु०॥ या गोंवळेनि जग । न दिसे जगपण भाग । पाहेपां सकळीं योग । तुझा तूंचि ॥२॥ अर्थुनि पाहे दृष्टि । तंव तुझ्यापायीं पडे मिठी । आवडी नोसंडी गांठी । तुझिया पायाची ॥३॥ आतां जरि निरुतें । तूंचि आत्मा तूंतें । सुखी सुखाचेनि निजप्राप्ति रया ॥४॥ तुझें स्वरुप अदृष्य । तो मुनिमानसींचा प्रकाश । इंदु तूं पूर्णांश । चैतन्यघन ॥५॥ बाप रखुमादेविवरा विठ्ठला पाहतां उघडा डोळा । दाविलें निधान रया ॥६॥