भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतीयां

pahoniyan sakal matantaren | baisala dhuren janatiyan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहोनियां सकळ मतांतरें । बैसला धुरें जाणतीयां ॥१॥ परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनि नेणते ॥२॥ बोलती उदंड सारांश गोष्टी । परत्वीं भेटी विरळे ते ॥३॥ निळा म्हणे वरदळवेषीं । नुतरती कसीं तयांपुढें ॥४॥