भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहोनियां आले ठाव । संत गांव सुखाचा

pahoniyan ale thav | sant ganv sukhacha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहोनियां आले ठाव । संत गांव सुखाचा ॥१॥ त्याचि दाविताती वाटा । सुगमा वैकुंठा जावया ॥२॥ बाळया भोळया सात्विक लोकां । करुनी नेटका उपदेश ॥३॥ निळा म्हणे परोपकारा । लागीं वसुंधरा विचरती ॥४॥