भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहों जातां हा न दिसे । झांकोळिला विश्वाभासें

pahon jatan ha na dise | jhankolila vishvabhasen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाहों जातां हा न दिसे । झांकोळिला विश्वाभासें ॥१॥ आतां पाहों कोणीकडे । आड आपणा हा दडे ॥२॥ डाहाळी आड आंबा । असोनि न दिसेचि उभा ॥३॥ साखर दिसे खडा । गोडी पाहों काणीकडा ॥४॥ निळा म्हणे सोनें । न दिसे झांकिलें भूषणें ॥५॥