भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां वटाचा विस्तारु कैसा

pahatan vatacha vistaru kaisa

पाहातां वटाचा विस्तारु कैसा । शाखा फ़ुटलिया कळिया तैसा ॥१॥ सांगा लपणें तें काय जालें । वटीं विस्तार दोही हारपले ॥२॥ विशुध्दचक्रीं मेरु हा नेडे । तेथें परदीपीं साहित्त्य जोडे ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला । मनोमानसी तयां सामावला ॥४॥