भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें

pahatan pahanen drushtihi vegalen

पाहातां पाहाणें दृष्टिही वेगळें । तें कैसें आकळे ब्रह्मतेसी ॥१॥ पाहातेंचि पाही नाहीं तेंचि काई । गयनिच्या पायीं तूंचि होसी ॥२॥ स्वरुपीं रमतां ह्रदयस्थ आपण । तयाचें स्वरुप आदिमध्य ॥३॥ बापरखुमादेविवर सगुणीं न माय । निर्गुणीं दिसताहे जनीं रया ॥४॥