भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहाणेंचि पाहासी काय पाहणें

pahanenchi pahasi kay pahanen

पाहाणेंचि पाहासी काय पाहणें तेथें नाहीं । पाहाणेंचि पाही पाहाणें रया ॥१॥ खुंटलें बोलणें बोलीं बोला बोलुचि मौन्य ठेला मौन्यामाजि ॥२॥ बापरखुमादेविवराविठ्ठलाचिये खुणें । अनुभविया बोलणें पारुषलें ॥३॥