भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें । सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय

paduni lagoya chenduvachya eka ghayen | sukhi khele khel sahya karuni hariche pay

रचनाकार: संत निळोबा · अभंग
पाडूनि लगोया चेंडुवाच्या एका घायें । सुखी खेळे खेळ साह्य करुनि हरीचे पाय ॥१॥ खेळे ऐसा खेळ । मनीं धरुनि घननीळ ॥२॥ उडोनिया जातां चेंडु न सांभाळे उसी । धांवतांचि मरती पोरें होतीं कासाविसी ॥३॥ निळा म्हणे झेलूनियां घेंई वरिच्यावरी । एकविध भावें शरण जाऊनियां हरी ॥४॥