भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडियेली जेव्हां यशोदेसी भ्रांती । ऐकें परीक्षिती प्रेम तिचें

padiyeli jevhan yashodesi bhranti | aiken parikshiti prem tichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पडियेली जेव्हां यशोदेसी भ्रांती । ऐकें परीक्षिती प्रेम तिचें ॥१॥ खोडी नको करूं ह्मणे दटाविलें । ह्मणोनि रुसलें तान्हें माझें ॥२॥ नंदासी ह्मणत पाहूं कोठें कृष्णा । दाटलासे पान्हा स्तनीं माझ्या ॥३॥ उद्धव चित्तांत करीतसे खेद । यशोदे सावध होई माते ॥४॥ निर्दय पापीण बांधीं मी उखळासी । म्हणोनि रुसलासी देवराया ॥५॥ माती खातां वेळे तुज मी मारिलें । म्हणोनि टाकिलें मजलागीं ॥६॥ नामा ह्मणे त्यांचें करीं समाधान । सांगे ब्रह्मज्ञान दोघांजणा ॥७॥