भजनी मालिका
← भजनांकडे परत

पडे प्रायश्चित्त बोलों नका कोणी । ऐकूं नये कानीं शब्द यांचा

pade prayashchitta bolon naka koni | aikun naye kanin shabda yancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पडे प्रायश्चित्त बोलों नका कोणी । ऐकूं नये कानीं शब्द यांचा ॥१॥ स्वर्गसुखासाठीं करिताति यज्ञ । टाकिती अवदान अग्निमुखीं ॥२॥ भोक्ता वनीं आला न कळेचि त्याला । पूर्ण ब्रह्म कृष्णाला न जाणती ॥३॥ कृपाळु बहुत परीक्षिती राया । उद्धार कराया पाठविलें ॥४॥ इच्छामात्रें पाडी अन्नाचे पर्वत । काकुलती येत अन्नासाठीं ॥५॥ गडियांसी कळे तेथील आकार । निघती सत्वर तेथुनिथां ॥६॥ येवोनियां कृष्णा सांगितलें त्यांनीं । हांसे चक्रपाणी नामा म्हणे ॥७॥