भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण

padatrayadi vilakshan natale varnavarna

पदत्रयादि विलक्षण नातळे वर्णावर्ण । पंचभूतिकपण नातळे ज्यासि ॥१॥ ते स्वयंभ प्रमाणें घनावलेन पणें । द्वैताद्वैत नेणें तैसें आहे ॥२॥ नामरुपाचा भेद तुटलासें संबंध । स्वयें निजानंद भोगी बापा ॥३॥ सारुनि लक्ष लक्षणा शास्त्राचा उगाणा । तेथ वेदांदि षडदर्शना नुमगे पाही ॥४॥ तयामाजि तें असतसे निरुतें । न चोजवें पंथें नवल ज्याचें ॥५॥ म्हणौनिया परिसा चौंचीचि उजरीं । तेंचि निर्विकारी प्रकाशले ॥६॥ निवृत्तिदास म्हणे हा निजभाव । बोलो नये ठाव तैसे जाले ॥७॥