भजनी मालिका
← भजनांकडे परत

पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राम्हाण म्हणती जनीनें नेलें

padak viththalachen gelen | bramhan mhanati janinen nelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राम्हाण म्हणती जनीनें नेलें ॥१॥ अगे शिंपियाचे जनी । नेलें पदक दे आणुनी ॥२॥ देवासमोर तुझें घर । तुझें येणें निरंतर ॥३॥ म्यां नेलें नाहीं जाण । सख्या विठोबाची आण ॥४॥ धोतर झाडूनि पाहती । पडलें पदक घेऊनि जाती ॥५॥ जनी वरी आली चोरी । ब्राम्हाण करिती मारा मारी ॥६॥ धाविन्नले चाळीस गडी । जनीवरी पडली उडी ॥७॥ दंडीं लाविल्या काढण्या । विठो धांवरे धावण्या ॥८॥ चंद्रभागे रोविला शूळ । जनाबाईस आलें मूळ ॥९॥ हातीं टाळीं वाजविती । मुखीं विठ्ठल बोलती ॥१०॥ विलंब लागला ते वेळीं । म्हणती जनिला द्यारे सुळीं ॥११॥ ऐसा येळकोट केला । जनी म्हणे विठो मेला ॥१२॥ तंव सुळांचें झालें पाणी । धन्य म्हणे दासी जनी ॥१३॥