भजनी मालिका
← भजनांकडे परत

पद तीर्थ दान हें सर्व कुवाडें । नाम एक वाड केशवाचें

pad tirtha dan hen sarva kuvaden | nam ek vad keshavachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
पद तीर्थ दान हें सर्व कुवाडें । नाम एक वाड केशवाचें ॥१॥ मुमुक्षु साधकीं सदा नाम गावें । तेणेंचिया व्हावें अखंडित ॥२॥ विपत्तीचें बळें न होतां विन्मुख । नाममात्र एक धरा वाचे ॥३॥ जीवन्मुक्त शुक मुनि ध्रुवादिक । तयासी आणिक ध्यास नाहीं ॥४॥ नामयाची वाणी अमृताची खाणी । घ्यावी आतां धणी सर्वत्रांही ॥५॥