भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसें वाटे

nivruttiraj mhane pralayincha vara | sutala sharangadhara aisen vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिराज म्हणे प्रळयींचा वारा । सुटला शारंगधरा ऐसें वाटे ॥१॥ हालतें गगन डोलती विमानें । गेलें देहभान अवघियांचें ॥२॥ अवघियांचे डोळे झांकले एकट । माध्यान्हीं अभूट वळुनि आलें ॥३॥ निवृत्ति पांडुरंग राही रखुमाई । धरा म्हणती घाई मुक्ताईला ॥४॥ नामा म्हणे केशवा जाहला उबाळा । कांहीं केल्या डोळा उघडों नेदी ॥५॥