भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी

nivruttinen baher anile gopal | ghatiyeli shila samadhisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥ सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥ आणिकांचीं तेथेम उद्विग्न तीं मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥ नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥