भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें

nivruttideva yogya gangechen ten snan | karun avaghejan avadinen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥ तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥ मार्गीं चालताती भक्त आणि हरी । आले भुलेश्वरीं अवघेजण ॥३॥ भुलेश्वरालागीं पूजा केली सांग । भक्त पांडुरंगें तीन रात्रीं ॥४॥ तेथून वैष्णव चालियेले हरी । आले सिद्धेशरीं देवभक्त ॥५॥ पाराशर ऋषींचें स्थळ पुरातन । राहिले नारायण पंचरात्र ॥६॥ नामा म्हणे देवा जावें कपिलेश्वरा । आनंद ऋषीश्वरा जाला फार ॥७॥