भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे

nivruttidev mhane chala gumphemadhin | achal he adi samadhi ase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं । अचळ हे आदि समाधी असे ॥१॥ सद्‌गुरुप्रसादें बोधिली नेटकी । गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥ दंड चक्राकार बांधिली चौकुन । आंत संतजन करिती वासा ॥३॥ ऐसे गुंफेमध्यें नाहीं नामदेव । म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥ गैनीची मिरास घेतला प्रमाण । पूर्वभूमि जतन करित आस ॥५॥ निवृत्तिदेव म्हणे मुक्ताईच्या उत्तरें । भाजलें कीं कोरें कळों येईल ॥६॥