भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा

nivrutti sopan muktai chavathi | anek vibhuti dnyaneshvara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥ नामा पुंडलिक गरुड हनुमंत । परस भागवता बोलविलें ॥२॥ विठ्ठल रुक्माई सत्यभामा राही । इतुके तयेठायीं जमा जाल्या ॥३॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । सांवता कुंभार एके ठायीं ॥४॥ गंगा गिरजा दोघी नीळकंठ ईश्वर । मध्यें ज्ञानेश्वर घेतियेला ॥५॥