भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे

nivrutti sopan anik muktai | jatati pahin konikade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे ॥१॥ देवासी गुह्यार्थ केला पां एकांत । ज्ञानदेवें हित आरंभिलें ॥२॥ नामा म्हणे अवघे बसा एकीकडे । ऐको द्या निवाडे गुज याचें ॥३॥