भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं

nivrutti muktaichen kariti samadhan | ghetala sopan madhyabhagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं ॥१॥ ऐक्य अहिक्याची बैसली एकवटे । विस्तारिलीं ताटें रुक्माईने ॥२॥ एक एकालागीं देताती प्रसाद । आतां ज्ञाजराज पाहूं डोळां ॥३। नामा म्हणे स्वस्थ जेवितां पंगती । घृतपात्र हातीं विस्तारितु ॥४॥