भजनी मालिका
← भजनांकडे परत

निवृत्ति मुक्ताई गोविंद गोपाळ । उठले सकळ स्नानालागीं

nivrutti muktai govind gopal | uthale sakal snanalagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निवृत्ति मुक्ताई गोविंद गोपाळ । उठले सकळ स्नानालागीं ॥१॥ राही रखमाई सहसमुदायेंसी । मुनि आणि ऋषि उठावले ॥२॥ करूनियां स्नान निघाले सकळ । नाचती गोपाळ गोदातीरीं ॥३॥ चांगदेवें सोवळें होऊनियां त्वरें । देव ऋषीश्वर पूजियेले ॥४॥ धन्य गोदातीर आदि हे अनादि । उरकिली समाधि यथासांग ॥५॥ नामयाचे पुत्र नारा विठा गोंदा । जागा झाडी महादा समाधीची ॥६॥