भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्या सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां

nitya sarun harikatha | tethen kal kay atan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नित्या सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ।। १ ।। वनवासी कां धाडिलें । कृपाळे वा हो विठ्ठलें || २ || आशा मनशा तृषा तिन्ही ह्या तो ठेविल्या बांधोनि ।।३।। काम क्रोध विषय झाले। हें ताँ मोहोनि राहिलें ।।४।। अवलोकृति कृपा दृष्टि। जनी म्हणे देई भेटी ॥५॥