भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां

nitya sarun harikatha | tethen kal kay atan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ॥१॥ वनवासी कां धाडिलें । कृपळें बा हो विठ्ठलें ॥२॥ आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥ काम क्रोध विषय झाले । हे तों मोहोनि राहिले ॥४॥ अवलोकूनि कृपा द्दष्टि । जनी म्हणे देईं भेटी ॥५॥