भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा

nitya nirgun sada asanen govinda

नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥ तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥ अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥ निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥