भजनी मालिका
← भजनांकडे परत

नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं

nitya ahman sukh tujhya payampasin | sharan konasi jaun ahmin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं ॥१॥ सकाळीं उठोनि ऐकतों कीर्तन । तेणें समाधान मज होय ॥२॥ उभा महाद्वारीं वैष्णव भेटती । सांखळ्या तुटती चौर्‍यांशीच्या ॥३॥ नामा ह्मणे सदा पंढरीं रहिवास । मागुता जन्मास येतो कोण ॥४॥