भजनी मालिका
← भजनांकडे परत

निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला

nishiyeche bharin bhanu pratibibin bimbala

निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला । बिंबचि गिळुनि ठेला बिंबामाजी ॥१॥ रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जायें । विपरीतगे माये देखीयेले ॥२॥ उदय ना अस्तु तेथें कैचेंनि त्रिगुण । आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥३॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे । संत ये खुणें संतोषले ॥४॥