भजनी मालिका
← भजनांकडे परत

निशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं

nishi divas doghe lopalen ten thayin

निशी दिवस दोघे लोपलें तें ठायीं । निरंजन ते ठायीं लक्षुनी पाहा ॥१॥ रवी शशी ज्याचें तेजें प्रकाशले । नवल म्यां देखिलें एक तेथें ॥२॥ नारी पुरुष दोघे एक रुपें दिसती । देखणें पारुखे तया ठायी ॥३॥ ज्ञानदेव म्हणे शि तेचि शक्ती । पाहातां व्यक्तीं व्यक्त नाहीं ॥४॥