भजनी मालिका
← भजनांकडे परत

निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य

nirapekshata man anakshar maunya

निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य । प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥ ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा । सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥ नित्यता अढळ नित्यपणें वेळे । विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥ रूपस सुंदर पवित्राआगर । चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥ नेणें हें विषय आकार न माये । विकार न साहे तया रूपा ॥५॥ निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार । ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥