भजनी मालिका
← भजनांकडे परत

निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रम्हींचें ठेवणे

nirakarinchen nanen | shuddha bramhinchen thevane

रचनाकार: संत नामदेव · अभंग
निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रम्हींचें ठेवणे ॥१॥ प्रयत्नें काढिलें बाहेरी । संतसाधु सवदागरीं ॥२॥ व्यास वसिष्ठ नारद मुनी । टांकसाळ घाटली त्यांनीं ॥३॥ उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनीं आटविली चांदी ॥४॥ केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥ पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥६॥