भजनी मालिका
← भजनांकडे परत

निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली

niliye rajani vahe motiya sarani | nilepanen khanin sampadali

निळिये रजनी वाहे मोतिया सारणी । निळेपणें खाणीं सांपडली ॥१॥ आंगणीं चिंतामणि जळधरु सिंपणी । अमृतसाजणी जीवनकळा ॥२॥ सुमनाचे शेजे विरहिणी विराजे । शयनीं सुलजे आरळ सेज ॥३॥ माजयानें हटीं मुखकमळ टेंकी । निळिये अवलोकी कृष्णमूर्ति ॥४॥ कमळणी आमोद सुस्वाद मकरंद । चंदनाची अभेद उटी अंगी ॥५॥ कर्पूरपरिमळें दिव्य खाद्य फ़ळें । ठेऊनि सोज्वळें वाट पाहे ॥६॥ मन तो निळिये गोविंदाचिये सोसे । विरहिणी पाहे वाटुलि ऐसी ॥७॥ ज्ञानदेवी निळिये वाटुले गोविंदीं । कृष्ण निळिये पदीं ठाव जाला ॥८॥