भजनी मालिका
← भजनांकडे परत

न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावें धर्मासी। व्यवहारासी न सांडी

nhaviyache vanshin| janma dila rushikeshi| pratipalaven dharmasi| vyavaharasi na sandi

रचनाकार: संत सेना · अभंग
न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावें धर्मासी। व्यवहारासी न सांडी॥१ ॥ ऐका स्वधर्मविचारी । धंदा करी दोन प्रहर । सांगितलें साचार । पुरणांतरीं ऐसें हें ॥ २॥ करूनियां स्नान । मुखी जपे नारायण। मागुती न जाण । शिवूं नये धोकटी ॥३॥ ऐसे जे कां न मानिती। ते जातील नरकाप्रती। सकळ पूर्वज बुडविती। । शास्त्रसंमती ऐसी हे॥४॥ शिरीं पाळावें आज्ञेसी। शरण जावें विठोबासी। सेना म्हणे त्यासी। ॠषीकेशी सांभाळी ॥५॥