भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणें जप तप नेणें अनुष्ठान

nenen jap tap nenen anushthan

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
नेणें जप तप नेणें अनुष्ठान । घालावें आसन कळेना तें ॥ १ ॥ ध्यानाचें लक्षण इंद्रियांचारोध । नाहीं याचा बोध ऐकियेला ॥ २ ॥ पाषाणप्रतिमा विठोबाचें ध्यान । ह्रदयीं चिंतन राममुद्रा ॥ ३ ॥ तुकारामकथा करावी ती द्वारीं । ऐसा हा अंतरीं हेत होता ॥ ४ ॥