भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा । हें तों मज देवा समजेना

nenen bhakti kanhin karun kaisi seva | hen ton maj deva samajena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेणें भक्ति कांहीं करुं कैसी सेवा । हें तों मज देवा समजेना ॥१॥ करूं कैसा जप करूं कैसें ध्यान । नाहीं माझें मन स्थिर देवा ॥२॥ कामक्रोध यांची मोठी हे जाचणी । जालों वेडयावाणी समजेना ॥३॥ नामा म्हणे माझे सांवळे विठाई । येऊनियां राही ह्रदयामाजीं ॥४॥