भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती

nene sahi shastren tuj keshiraja | svarupen kubaja kay hoti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नेणे साही शास्त्रें तुज केशिराजा । स्वरूपें कुबजा काय होती ॥१॥ न मागें मी तैसा न मागें मी तैसा । न मागें मी तैसा कदा काळीं ॥२॥ कौरवांचे काजीं घेसी गाढेपण । धर्मा वरीं पूर्ण घोडे धुसी ॥३॥ नामा म्हणे आह्मी कीर्ति वाखाणावी । भक्तांसी गोसांवी होसी देवा ॥४॥