भजनी मालिका
← भजनांकडे परत

नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा

nenati mahima brahmadik bhadra

नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा । आणि ते महेंन्द्र नानस्थानी ॥१॥ तें रूप खेळत गौळियांच्या संगे । पुंडलिका मागे भीमातीरी ॥२॥ उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग । दुजियाचा संग नाहीं ज्यासी ॥३॥ निवृत्ति प्रगट गुरुमंत्र फळद । गोपाळ विद्नद ब्रह्म सेवी ॥४॥