भजनी मालिका
← भजनांकडे परत

नवांची खाणी दहाव्यानें शोकिली

navanchi khani dahavyanen shokili

नवांची खाणी दहाव्यानें शोकिली । अकराव्यानें जाली देशधडी ॥१॥ तें ब्रम्हपंथीं माखलें । मरोनि जागृत ते जालें मन गे माये ॥२॥ अवघे अंबर माझें तिंबलें । ब्रह्मरसें पिळिलें वो रंग नव्हे ॥३॥ सार वियोगें माझें कर्म बुडालें । निष्कर्म जाले म्हणौनि नातळे ॥४॥ जागृति स्वप्न सुषुप्ति बुडाली । रखुमादेविवरें सहित गिळीली ॥५॥